एसटी कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशावर तात्काळ उपचार

ई पेपर बीड
Spread the love

 

दिंद्रुड। प्रतिनिधी

एसटी चा प्रवास सुखाचा प्रवास या एसटी महामंडळाच्या ब्रिदाचा अनुभव गुरूवारी एका प्रवाशाला आला. पुणे परळी या आष्टी जि बीड आगारातील बस मधील चालक- वाहकांच्या प्रसंगावधानाने वयोवृद्ध प्रवाशा प्रवासात चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याची घटना घडली,सदर प्रवाशास बसवाहक-चालकाने तात्काळ दखल घेत रुग्णवाहिकेस पाचारण करत दवाखान्यात शरिक केल्याने प्राण वाचले.

सविस्तर माहिती अशी की परळी तालुक्यातील इंजेगांव येथील कोंडीबा कराड (वय ५१वर्ष) तेलगाव बसस्टँड वरुन पुणे परळी या बसगाडीत परळीकडे जाण्यासाठी बसले, गाडीत मोजकेच प्रवासी प्रवास करत होते,कराड यांना अचानक चक्कर येऊन ते शिटवर बेशुद्ध पडल्याचे काहि प्रवाशांना निदर्शनास आले असता त्यांनी हि बाब चालक व वाहकास सांगितली. बसचालक गहिनीनाथ अनारसे व वाहक गायकवाड यांनी तात्काळ गाडी दिंद्रुड येथिल खाजगी रुग्णालयात नेत प्रथमोपचार करुन कोंडीबा कराड यांना रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून परळीकडे हलवले. बस वाहक-चालकाच्या प्रसंगावधानाने सदर प्रवाशाला तात्काळ आॅक्सिजन सह रुग्णवाहिका मिळाल्याने प्राण वाचले असुन कराड कुटुंबाने बसचालक गहिनीनाथ अनारसे व वाहक गायकवाड यांचे आभार मानले.सद्या कोंडीबा कराड यांची प्रकृती ठिकाणी आहे.

“एक प्रवासी प्रवास करत असताना अचानक चक्कर येऊन पडला ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी बस वाहक व चालक यांच्या निदर्शनास आणली असता दोघांनीही सहकार्य करत सदर इसमास तात्काळ दिंद्रुड येथे प्रथमोपचार करत रुग्णवाहिकेतून परळी कडे पाठवले बसचालक व वाहकाची सतर्कता हि कौतुकास्पद असुन एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास या ब्रिदाला साजेसे आहे.”

-माऊली खाडे, दिंद्रुड (सहप्रवासी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *