इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ व मुख्याध्यापक आरेफ शेख यांना सेवानिवृत्ती सेवा गौरव समारंभ संपन्न

ई पेपर
Spread the love

दिंद्रुड प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शार्दुलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरा गांधी कन्या शाळेच्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ व मुख्याध्यापक आरेफ शेख यांना सेवानिवृत्ती सेवा गौरव समारंभ शनिवारी संपन्न झाला.

या कार्यक्रमास शार्दुलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,माजी आमदार मोहनराव सोळंके, सचिव अॅड विठ्ठल तिडके, शिंदफणा प्रसारक मंडळाचे सचिव नारायण शिंदे, माजी सरपंच श्रीराम काळे, सरपंच अतुल ठोंबरे, शार्दुलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, दिंद्रुड व परिसरातील पालक, नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील एकमेव कन्या शाळा हि दिंद्रुड येथे गेल्या ३० वर्षांपासून चालू आहे. या शाळेतुन बहुसंख्य विद्यार्थिनी वैद्यकीय,यांत्रिकी,शैक्षणिक,राजकिय क्षेत्रात आज घडीला कार्यरत आहेत, ३० वर्षेांपुर्वीची अतिशय प्रतिकुल परिस्थितीत सुरु केलेल्या इंदिरा गांधी कन्या शाळेत हजारो मुलींनी यशस्वी जिवन घडवले आहे. या शाळेच्या प्रगतीत मुख्याध्यापक आरेफ शेख यांचा खारीचा वाटा असल्याचे प्रतिपादन संस्था अध्यक्ष मोहनराव सोळंके यांनी आयोजित कार्यक्रमात केले. ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेण्यासाठी माझी सतत भुमिका राहिल्याने व ती शाळेच्या शिक्षकांनी योग्य रितीने पुर्ण केल्याचे समाधान असल्याचे सोळंके यांनी सांगितले. या कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थींनीसह मुख्याध्यापक आरेफ शेख यांनी शाळेचा निरोप घेत असताना सर्व विद्यालयातील शिक्षक वृंदा सह विद्यार्थी नी भाऊक झाले होते. जाताजाता सर्व विद्यार्थ्यीनिंना शालेय शिक्षण काळात कशाप्रकारे नित्य नियम पाळायचे या बाबत शेख सरांनी सांगत असताना अभ्यास करतांना घ्यावयाची काळजी, मोबाईलच्या अतिरिक्त वापराचा दुष्परिणाम,शिक्षकांबाबतचा आदर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दिंद्रुड पत्रकार संघ, आईप्रतिष्ठान,चंद्रभागा परिवार सह विद्यार्थींनीनी श्रीयुत आरेफ शेख सरांचा सत्कार करत पुढिल जिवनात दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *