परीक्षा केंद्रावर पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात… दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल

ई पेपर क्राईम बीड
Spread the love

 

दिंद्रुड प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील तेलगाव च्या सरस्वती महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोलिसांशी हुज्जत घालणे तरुणाला चांगले च महागात पडले असून दिंद्रुड पोलिसांनी सदर तरुणास अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की तेलगाव येथील सरस्वती महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू असून कॉपीबहाद्दरांना अटकाव करण्यासाठी दिंद्रुड पोलिसांचे पथक दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ.बालाजी सुरेवाड, बाबासाहेब घोळवे, गणेश राठोड, भगवान गायकवाड, वैजनाथ वनवे अादि कर्मचारी महाविद्यालय परिसरात गस्त घालित असतांना चंद्रकांत वैजनाथ धुमाळ या तरुणाने ‘मला बाहेर काढणारे तुम्ही कोण’ तुम्ही तेलगांवला या पुढे नोकरी कसे करता ते पाहतोच असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घातली यात पोलिसांवर मोबाईल भिरकावत, पोलिस कर्मचार्याची गचुंडी धरत हल्ला केल्याने दिंद्रुड पोलिसांनी त्यास पकडत चोप दिला.
दरम्यान सदर तरुणास दिंद्रुड पोलिसांनी अटक केली असुन आरोपी चंद्रकांत वैजनाथ धुमाळ याच्यावर पोलिसांशी हुज्जत घालत धमकावणे व झोंबाझोंबी करत सरकारी कामात अडथळा आणणे याबाबत पोलिसांनी गुन्हा नंबर 46/ 2020 कलम 353,332,504 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. काॅ. गणेश राठोड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *