आझाद मैदानावर CAA, NRC विरोधात भव्य मोर्चा ; ६५ संघटनांचा सहभाग

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

आज मुंबई येथील आझाद मैदानावर वेगवेगळ्या ६५ संघटनांकडून CAA, NRC विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. देशात अनेक ठिकाणी CAA, NRC विरोधात मोर्चे निघाले आहेत. यातच मुंबई मध्ये आझाद मैदानावर एक भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात अनेक संघटना आणि वेगवेगळ्या ध्रर्माची लोक सहभागी झाली आहेत. भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने CAA, NRC विरोधात मोर्चे काढले होते. मात्र आजच्या मुंबई येथील मोर्च्यात अनेक धर्माचे लोक सहभागी झाले आहेत. काही दिवसापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी CAA, NRC च्या समर्थनात भव्य मोर्चा काढला होता.

 

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *