चूक तुमच्या लक्ष्यात आली असेल तर त्यांना जेल मध्ये टाका : वृंदा करात यांचा अमित शहांना सल्ला

मुंबई राजकारण
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

‘भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो…’असे वक्तव्य दिल्ली निवडणूक प्रचारात केले होते. निकालानंतर शहा म्हणतात, असे
म्हणायला नको होते. शहा यांना चूक लक्षात आली असेल तर आता ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी माकप नेत्या वृंदा करात यांनी केली. त्या औरंगाबादेत एका कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
वृंदा करात यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही टीका केली. सर्वसामान्य जनतेला अडचण करणारा अर्थसंकल्प मांडला गेला आहे. आता गॅस दरवाढ म्हणजे सर्वसामान्य कुटुंबावर हल्ला आहे. हे केंद्र सरकार पाकिटमार सरकार आहे, अशी तोफ करात यांनी डागली तसेच दिल्लीत यंत्रणेचा
गैरवापर केला गेला तरीही मतदारांनी भाजपला नाकारले. अमित शहा हे होम मिनिस्टर नव्हे तर हेट मिनिस्टर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते दिसून आले, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या काही नेत्यांनी ‘गोली मारो’ असा नारा दिला, ‘ही निवडणूक म्हणजे भारत-पाकिस्तान सामना आहे,’ अशी तुलना केली. भाजपच्यानेत्यांनी केलेली ती वादग्रस्त
वक्तव्ये अजिबातच योग्य व स्वीकारार्ह नव्हती. ती पक्षाला मान्य नाहीत, ती आम्हाला भोवली असावीत, अशी कबुली अमित शहा यांनी दिली होती.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *