महिलांवरील जीवघेणे हल्ले सुरूच

औरंगाबाद संपादकीय
Spread the love

महाराष्ट्रातील महिला किती असुरक्षित आहेत हे राज्यात घडणाऱ्या अनेक घटनावरून सिद्ध होत आहे. समाजात महिला व पुरूषांचे प्रमाण सम समान असतानाही वासनांध प्रवृत्तीच्या पुरूषांना झाले आहे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगणघाट, औरंगाबाद, जालना येथील महिलांची जळीत हत्याकांडाची प्रकरणे ताजी असताना नागपुर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरावर अॅसिड फेकुन जीवघेणा
हल्ला केला आहे. काल गुरूवारी दुपारी 12 च्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झाला असून या प्रकरणात निलेश कन्हेरे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपुरातील एका रूग्णालयात वैद्यकिय सेवा पुरवणारी ही डॉक्टर महिला आपल्या सहकाऱ्यासह सर्वेक्षणासाठी सावनेरला गेली असताना
तिच्यावर एका युवकाने महिला डॉक्टरावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्याचा उद्देश काय होता हे अद्याप जाहीर झालेले नसले तरी महिलेवर हल्ला करताना हल्लेखोराची मानसिकता कशी होती हे तपासणे आवश्यक आहे. समाजात महिलांकडे पाहताना एक भोगवस्तू म्हणून पाहण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना देवी-देवतांचा दर्जा देण्यात आला असून तिचे पूजन होते. तर दुसरीकडे त्याच महिलेला शो पीस म्हणून पाहिले जाते. समाजातील या दुहेरी दृष्टीकोनामुळे वासनांध पुरूष मंडळी महिलांवरील अत्याचार बलात्कार, विनयभंग सारख्या घटनांशी वेगाने वाढ होत असून त्या रोखण्यासाठी प्रचलित कायद्यात सुधारणा करून आरोपीला कडक शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. नोकरी करणारी महिला म्हणजे गरीब गाय कुणीही यावे तिच्यावर अत्याचार करावेत आम्हाला कोण आठवणार आहेत अशी भुमिका जाहीरपणे घेतली जात आहे. महिलांनी ही आता स्वसंरक्षणासाठी दुसऱ्यावर पोलिसांवर अवलंबून न राहता स्वत:चे रक्षण स्वत: करण्याची गरज आहे.
महिलांवर अन्याय,अत्याचारानंतर त्यंाना लवकर न्याय मिळेल याची सुतराम शक्यता राहिली नाही. समाजात पुरूष जाती बरोबरच महिलांचा जन्मदर वाढवण्याची आज आवश्यकता पुरूषापेक्षा महिलांची संख्या घटत चालली असल्यामुळे महिला व मुलीवर लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत. समाजाला अजून किती महिला, मुली व युवतीचे बळी पाहिजेत असा कटू सवाल विचारावा वाटतो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी,
व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या मुली, महिला सुरक्षित घरी परततील का या चिंतेत घरची मंडळी असतात. शासन यंत्रणेने या प्रकरणात अत्यंत कडक धोरण अवलंबून आरोपीला कठाेरात कठोर शिक्षा सुनावून त्या निकालाची सुनावणी सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजे असे वाटते. तरच महिलांवरील वाढत जाणारे जीवघेणे हल्ले कमी होतील असे वाटते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *