औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार : राज ठाकरे

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

च्या नामांतराच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संभाजीनगर नावाचा लावलेला रेटा पुन्हा एकदा
स्पष्ट झाला असून शहराला एक चांगले नाव द्यायला काय हरकत आहे. मुळातच ही मागणी संघाने केली होती, असे म्हणत मनसेप्रमुख राज
ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेला उपरोधिक चिमटा घेतला. दरम्यान त्यांनी भाजपशी युती करणार नसल्याचे चर्चेत स्पष्ट केले. तीन
दिवसाच्या दौऱ्यावर ते आले असता सकाळी संपादक व पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. यावेळी विविध मुद्यावंर ते बोलले.
दरम्यान महापालिकेच्या कामांबाबतही त्यांनी परखड टिका केली.
‘व्हॅलेनटाईन डे’च्या अनुषंगाने बाेलताना ते म्हणाले की, याकडे लक्ष देण्यापेक्षा देशात महिलांवर अॅसिड हल्ले होत आहेत, त्याकडे
लक्ष देण्याची गरज आहे. बाकीच्या फुटकळ गोष्टी सुरू असल्याचे ते म्हणाले. पुलवामा हल्ल्यास एक वर्ष झाले यावर भाष्य करताना जे शहिद झाले त्यांच दुर्देव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळी चर्चो होती, तसे काही पुरावेही समोर आले होते. मला वाटते जे घडायचे होते, ते घडले. जायचे ते लोक गेले.नवीन सरकार बसले. सगळ्या गोष्टी घडल्या, अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केले. हिंदुजननायक उपाधीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी कानावर हात ठेवत चिडूनच यासर्व पदव्या तुम्हीच प्रसारमाध्यमवाल्यांनी दिल्याची कोटी केली.

रविवारच्या मोर्चात एका चॅनलवाल्याने तर हा मुद्दा लावूनच धरला होता. त्याची आठवणही त्यांनी यावेळी करून देत मी तस काही मानत, नाही, हिंदुह्रदयसम्राट उपाधी लावण्यात अाली. त्यावेळीही सर्व कार्यकत्यांना सूचना दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. मी त्यांना ईव्हीएम संदर्भात ही भेटलो आहे. आपल्याकडे कोणला भेटले की
मैत्री झाली अशी चर्चा सुरू होते राजकारणात अनेकांशी संबंध असतातच, असे म्हणत भीमा कोरगावचा तपास लागला पाहिजे हे महत्वाचे असून तो कोण करत आहे हेही महत्वाचा आहे, असे म्हणत टोलेबाजी त्यांनी केली. पक्षाच्या बदलेल्या झेंड्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की तीन वर्षापूर्वीच हा झेंडा निवडणूक आयोगाला हा झेंडा देखील असेल, असे सांगितले होते, आता फक्त तो जाहिर केला एवढेच. पण निवडणूक काळात रेल्वे इंजिनच दिसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसे भूमिका बदलत आहे, असे बोलल्या जात आहे. पण माझी भूमिका पूर्वीचीच भूमिका
कायम आहे, असे म्हणत त्यांनी अनेक दाखले दिले. माझ्या मराठीला नख लावाल तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल. माझ्या धर्माला नख लावाल तर मी हिंदु म्हणून अंगावर जाईल चांगल्या गोष्टींसाठी बदल झाला पाहिजे असे ते म्हणाले.
महापलिकेच्या कारभारावर टीका
औरंगाबादेत मृत विहिरी जिवंत केल्या. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही आणि ज्यांच्याकडे सत्ता नाही त्याला प्रश्न विचारले जातात. नाशिकमध्ये जे काम आम्ही पाच वर्षात केले ते काम औरंगाबादेत सत्ते असलेले ३० वर्षात का करू शकले नाहीत? तसे ही विकास पाहून मतदान होत नाही ते नाशिककडे पाहून कळले. नाशिकमध्ये जे केले ते मी नाशिककरांना सांगितजे देखील नव्हते, असे म्हणत त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या कारभारावर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेनंतर पक्षाला औरंगाबाद किंवा मराठवाड्यात अपेक्षित यश मिळाले नाही. त्याबदल तुमचे मत काय असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पक्ष संघटनेवर अधिक भर देणार असून शुक्रवारच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात येईल, असे सांगून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मनसे सर्व ११५ जागा स्वबळावर लढवणार आहे. असे सांगून भाजपशी
युती करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आज परतणार मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा तीन दिवसांचा होता, परंतु ते आज सकाळीच मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *