प्रेमविवाह न करण्याची शपथ मुलींना का; पंकजांचा सवाल

मुंबई राजकारण

१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनडे हा प्रेमाचा दिवस साजरा होत असताना अनेक ठिकाणी महाविद्यालयात मुलींना मी प्रेम करणार नाही, व प्रेमविवाह करणार नाही अशी शपथ देण्यात आली. यावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ही शपथ मुलींनाच का? असा प्रश्न विचारला आहे. देशात मुलींवर होत असलेले हल्ले वाढत आहेत. गेल्या जाही दिवसात महाराष्ट्रातही अश्या अनेक घटना घड्लेल्या आहेत.

यावर पंकजा मुंडे यांनी ‘कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाहन करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची… त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अॅसिड फे कणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितले तर त्याला चोख प्रत्युत्तर देणार’ अशा तीव्र भावना पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त के ल्या आहेत.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *