पृथ्वी शी कोणतीही स्पर्धा नाही : शुभमन गिल

खेळ जगत देश-विदेश
Spread the love

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टि-२० आणि वनडे मालिकेनंतर आता दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. भारताने ५-० ने टि-२० मालिका जिंकली आहे. तर न्यूझीलंड ने जोरदार पलटवार करत ३-० ने वनडे मालिकेत भारताला पराभूत केले होते. वेलिंग्टन येथे २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आता सुरवात होणार आहे.

कसोटी संघात भारताकडून दोन युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांची निवड करण्यात आली आहे. याअगोदर पृथ्वी शॉ ची कसोटी संघात निवड झाली होती. परंतु शुभमन गिलला प्रथमच कसोटी संघात संधी मिळाली आहे. सलामीसाठी दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे बघावे लागेल. यावर त्याने आपले मत व्यक्त केले आहे संघातील सलामीच्या स्थानासाठी पृथ्वी शॉ याच्याशी कोणतीही स्पर्धा नाही; परंतु संधी मिळाल्यास ती वाया घालवणार नाही असे त्याने म्हटले आहे.

वेलिंग्टन येथे २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सलामीच्या स्थानासाठी पृथ्वी भक्कम दावेदार आहे. परंतु न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध द्विशतक आणि शतक झळकावून शुभमनने संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधले आहे. दोघांचीही २०१८च्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वविजेतेपद जिंकण्यातमहत्वाची भूमिका होती.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *