‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ : राज ठाकरे

औरंगाबाद राजकारण
Spread the love

मनसेप्रमुख राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर प्रथमच ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना ‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ असं सांगितलं आहे.

राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे औरंगाबादमध्ये हार्दिक स्वागत, असा मजकूर असलेले बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात लावण्यात आले आहेत.  त्यानंतर त्यांना पत्रकारपरिषदेत प्रश्न   विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरे म्हणाले की,. ‘मी असं काही मानत नाही ‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा,’ असं ते म्हणाले. मला हिंदू जननायक म्हणू नका असं त्यांनी यावेळी सांगितलं.  मी फक्त झेंडा बदललाय, अजेंडा नाही. माझी भूमिका बदललेली नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मी मराठी म्हणून अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला हात लावल्यास हिंदू म्हणून अंगावर जाईन, या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *