मुख्यमंत्र्याच्या त्या निर्णयावर शरद पवार नाराज

राजकारण
Spread the love

साथी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाची तपासणी NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्याच्या या निर्णयावर मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी आपले स्वतःचे अधिकार वापरत हा निर्णय NIA कडे दिला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

भीमा कोरोगाव एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने राज्याकडे न देता स्वतःकडे घेणे चुकीचे आहे. आणि राज्य सरकारने त्याला मान्यता देणे अधिक चुकीच आहे. परंतु त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सर्व मुख्यमंत्र्याना आहे. अस शरद पवार म्हणाले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिदषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्याच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज झाले आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील माझा निर्णय बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याना आहे असे सांगितले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *