प्लास्टिक बंदीवरील कार्यवाही तीव्र करा : पर्यावरण मंत्री

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

शहराला प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करावे यासाठी प्लास्टिक बंदीवरील कार्यवाही तीव्र करा. नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करा. ‘मी प्लास्टिक वापरणार नाही’ ही लोकचळवळ व्हावी, या दृष्टीनेही प्रयत्न करा, अशा सूचना पर्यावरण, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनपा प्रशासनाला केल्या. त्याचबरोबर शहर सुंदर बनविण्यासाठी आणि येथील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी सर्व सोयी सुविधा नागरिकांना द्या, असेही श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जागतिक पातळीवर औरंगाबाद जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्रात नावलौकिक आहे. या ठिकाणी ऐतिहासिक असा अमुल्य ठेवा आहे. या शहराला अधिक सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने अधिक कार्यक्षमपणे  येथील नागरिकांना सुविधा देण्यावर भर द्यावा. कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी. त्यासाठी वर्गीकृतपणे कचऱ्याचे संकलन करावे. शहरातील रस्त्यांची योग्य देखभाल करावी. पदपथासाठी एम्बॉस काँक्रिटीकरण पर्यायाचा विचार करावा. त्याचबरोबर रस्त्याच्या पदपथाचे सुशोभिकरण करावे. रस्ता, पदपथ, दुभाजक, दिवे यांची दुरूस्ती सातत्याने करावी. शहराला विद्रूप करणाऱ्या चारचाकी, अतिक्रमणे तत्काळ हटवावीत. वृक्षारोपणावरही भर द्यावा. शहरात नागरिकांना देण्यात येत असलेल्या शहर बस बरोबरच कमी पल्ल्याच्या अंतरासाठी मिनी बस असावी. तर पर्यटन बस सुविधा देण्याबाबतही मनपाने कार्यवाही करण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. ठाकरे यांनी दिल्या.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *