कुठल्याही क्षणी होऊ शकते संभाजीनगरची घोषणा ; चंद्रकांत खैरे 

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

शहराचे ‘संभाजीनगर’ नाव करण्याला कायदेशीर स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंतची माहिती
मागवून घेतली आहे. कुठल्याही क्षणी त्यांच्याकडून नामकरणाची घोषणा होऊ शकते. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ‘संभाजीनगर’ असे
नामकरण करण्याची मागणी केली. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसेच्या मागणीवर टिका केली.

खैरे म्हणाले की, मनसेचे आमदार राजू पाटील हे नवीन आहेत, त्यांना या शहराबद्दल फारशी माहिती नाही. या शहराचे “संभाजीनगर’ असे नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत तेव्हाच केले होते. शिवसेना आणि छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारी धर्माभिमानी जनतादेखील शहराचा उल्लेख संभाजीनगर
असाच करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *