त्या वक्तव्यांनी घात केला; अमित शाहांची कबूली

राजकारण
Spread the love

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. यानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपा नेत्यांनी केलेली गोली मारो सारखी वक्तव्ये महागात पडली. या वक्तव्यांनी घात केला, अशी वक्तव्ये भाजपा नेत्यांनी करायला नको होती, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शहा म्हणाले की, भाजपा हा असा पक्ष आहे जो विजय आणि पराभव यासाठी निवडणूक लडवतनाही. आम्हाला विचारधारेचा विस्तार करायचा असतो हेही त्यामागचे कारण असते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी व्यक्त केलेला अंदाज चुकला. गोली मारो, भारत-पाकिस्तान मॅच अशी काही वक्तव्ये भाजपा
नेत्यांनी केली जी करायला नको होती, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच आगामी काळात अशा वक्तव्यांपासून नेत्यांनी दूर राहिले
पाहिजे असेही त्यांनी सुचवले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत  झालेला पराभव आम्ही स्वीकारला आहे. जनतेने जो कौल दिला तो
आम्हाला मान्य आहे असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘गोली मारो’चे वक्तव्य केले होते. तर भारत पाकिस्तान मॅचसंदर्भातले वक्तव्य हे कपिल मिश्रा यांनी केले होते. ‘गद्दारोको गोली मारो’ असे भावना भडकावणारे वक्तव्य केल्यानंतर अनुराग ठाकूर यांच्यावर बरीच टीका झाली होती. या प्रकरणी निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांना नोटीसही बजावली होती. दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजपा आणि आपने प्रतिष्ठेची केली होती.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *