नेत्यांवरील गुन्ह्याची माहिती प्रसिद्ध करा : सर्वोच्च न्यायालय

राजकारण

नवी दिल्ली  : साथी ऑनलाईन

विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणे आणि गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राजकीय नेते आणि त्यांच्यावरील गुन्हे हा विषय अनेकदा चर्चेला आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी निवडणुका लढवण्यास बंदी आणावी, अशीही मागणी अनेक वेळा पुढे आली होती. मात्र, ती चर्चा हवेतच विरली. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात
सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयासमोर गुरूवारी सुनावणी झाली. पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांची निवडीची कारणे, महत्त्वाची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याचबरोबर वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल माध्यमातूनही ही माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *