आमचं उष्ट कोणी खाऊ नये; नामकरणावरुन ना. गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक टोला

राजकारण

जळगाव : साथी ऑनलाईन

औरंगाबादेत मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर म्हणूनच करतात. त्यामुळे आमचे उष्ट कोणी खाऊ नये, असे टीकास्त्र शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आमचे सरकार पाच वर्ष चालणार : भाजप काहीही म्हणत असलं तरी आमचं सरकार पाच वर्षे जोरदार चालेल. त्यांना त्यांचे आमदार सांभाळून ठेवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल उंचावून ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा सत्ते येत असल्याचे सांगत राहावे लागत आहे. मात्र, आम्ही पाच वर्षे पूर्ण करणार असल्यचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *