तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे हे आहेत आयुर्वेदिक फायदे

आरोग्य
Spread the love

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आपण जर तांब्याच्या भांड्याने पाणी पिळत तर पुढील फायदे होऊ शकतात.

१) तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये तांब्याचा अंश उतरल्याने पाण्यातील रोगजंतू मरतात, म्हणूनच तांब्यातील भांड्यातील पाणी पिणे आरोग्यदायी ठरते.
२) तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्यामुळे शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. तांब्यातील खनिजे शरीरातील थायरॉईडग्रंथींचे कार्य सुरळीत पार पडण्यास मदतशीर ठरतात. सहजच थायरॉईड्च्या आजारापासुन आराम मिळण्यास मदत होते.
३) तांब्यामध्ये दाह दूर करण्याची क्षमता असल्याने, संधिवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते.
४) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
५) तांब्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
6 ) तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. तांब्यातील घटक शरीराला आवश्यक असलेला मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद शरीराबाहेर बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
7) तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल असल्याने शरीरातील जखमा भरून काढण्यास मदत होते.
8) तांब्याच्या भांड्यातठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करते.
9) या पाण्यामुळे फोड्या, तारुण्यापीटिका तसंच त्वचे संदर्भातील रोग होत नाहीत. तसंच त्वचा साफ आणि चमकदार होते.
10) तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर
करण्यातही फायदेशीर ठरते. अशा या बहुगुणी तांब्याचा उपयोग आपण नक्की करून घेतला पाहिजे. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊन
नक्कीच आपण आपल्या शरीराला विविध फायदे मिळवून देऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *