शिवजयंतीपासून कॉलेजमध्येही राष्ट्रगीत अनिवार्य

पुणे राजकारण
Spread the love

पुणे : साथी ऑनलाईन

शिवजयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारीपासून होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी
पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. सामंत म्हणाले, महाविद्यालयाचे कामकाज सुरु होताना त्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली पाहिजे, असा निर्णय आम्ही यापूर्वी घेतला होता. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवातही राष्ट्रगीताने व्हायला हवी, असेही आमचे म्हणणे होते. त्या निर्णयाला अनुसरुन याबाबतचा आदेश १९ फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही निर्गमित करणार आहोत. याबाबतचे
परिपत्रक १९ तारखेला प्रत्येक कॉलेजमध्ये जाईल. या निर्णयामुळे दरदिवशी १५ लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातले हे पहिले राज्य आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *