न्यूझीलंड टीमने वनडे सीरिजमध्ये घेतला बदला ; भारतावर व्हाईट वॉश ची नामुष्की 

खेळ जगत

माऊंट मांगनुई : वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंड ने भारताला व्हाईट वॉश देत. टी-२० सीरिजचा बदला घेतला आहे. वनडे सीरिजमध्ये भारताला तीनही सामन्यात पराभवाची नामुष्की ओढवली आहे. आजच्या समन्यात भारताने न्यूझीलंड संघासमोर २९६ धावांच लक्ष ठेवलं होत. त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला आहे.

न्यूझीलंड चे सलामी बल्लेबाज मार्टिन गप्टील आणि हेन्री निकोल्सने न्यूझीलंडला १०६ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन संघाला चांगली सुरवात करून दिली.  मार्टिन गप्टील ६६ तर हेन्री निकोल्सने सर्वाधिक ८० धावा करून माघारी परतले. त्यानंतर रॉस टेलर १२ रन करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. केन विलियमसनने २२ रन करून आपली विकेट्स गमावली. त्यानंतर कॉलीन डि ग्रॅण्डहोम आणि टॉम लेथम ने संघाला विजयापर्यंत नेवून पोहचवले. कॉलीन डि ग्रॅण्डहोमने २८ बॉलमध्ये नाबाद ५८ करत जलद धावसंख्या वाढवली. तर टॉम लेथम ३४ बॉ़लमध्ये ३२ रान करून संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. युझवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट अपल्या नावावर केल्या. नवदीप सैनी आणि जसपीत बुमराह ला मात्र एकही विकेट्स मिळवता अली नाही. या सांमन्यासह न्यूझीलंड ने तीनही सामने भारताला हरवत टी-२० सीरिजमध्ये ५-०ने झालेल्या व्हाईट वॉश चा जशास तसा बदला घेतला.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *