वजन कमी करणाऱ्या गोळ्या घेतल्याने तरुणीचा मृत्यू

आरोग्य मुंबई

ठाणे : साथी ऑनलाईन

वजन कमी करणाऱ्या गोळया घेतल्यानंतर ठाण्यामध्ये एका तरुण मुलीचा मृत्यू झाला आहे. जीममध्ये वर्कआऊटला निघण्याआधी तिने या गोळया घेतल्या होत्या. ती जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होती. मेघना देवगडकर (२२) असे मृत मुलीचे नाव आहे. गोळया घेतल्यानंतर तिला उलटयांचा त्रास सुरु झाला. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे दाखवण्यात आले, आणि नंतर  सायन रुग्णालयात हलवले. परंतु तिचा काही तासातच मृत्यू झाला.

तिच्या शरीरातील तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले. रक्तदाब आणि ह्दयाचे ठोके वाढले असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कार्डीअक अरेस्टने तिचा मृत्यू झाला. असं डॉक्टरांनी सांगितले. बंदी घातलेल्या गोळया तिला कशा मिळाल्या हा प्रश्न उपस्थित झाला आहे. करणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. एफडीएला अहवाल पाठवण्यात आला आहे. मेघनाला बंदी घातलेल्या गोळया कशा मिळाल्या त्या अंगाने आता तपास सुरु आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *