छातीतील कफ कसा कमी करावा ?

आरोग्य औरंगाबाद

हिवाळ्यात सर्दी, खोकला, कफ होणं ही सामान्य समस्या आहे. त्याशिवाय हिवाळ्यात सर्वांत जास्त समस्या निर्माण होते, ती म्हणजे घसा आणि
छातीत चिकट कफ तयार होतो. कफामुळे घशास त्रास होतोच; पण इतरही काही त्रास होत राहतात. कफाच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी अनेक प्रकारची औषधं आणि सिरप यांचं सेवन केलं जातं. काही वेळा आराम मिळतो; पण काही वेळा मात्र लवकर आराम मिळत नाही.

चार तुळशीची पाने, ३ लवंगा, २ वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा, ४ कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात
साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या. ( हा काढा २ वर्षावरील मुलांना अर्धा कप ह्या प्रमाणात दिवसातून २ वेळा प्यायला द्या.)
1 गरम पाण्याची वाफ –
काही वेळा छातीत कफ जमा झाल्यास छातीत दुखू लागते. यावेळी कोणत्याही औषधांचा वापर करण्यापेक्षा सरळ गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे कफ मोकळा होऊन श्वसनाचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होऊ लागतो. वाफ घेण्यापूर्वी
गरम पाण्यात पेपरमेटं अॅसेशिंयल तेलाचे एक-दोन थेंब टाकावेत. या पाण्याची वाफ दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास नक्कीच आराम पडू
शकतो.

2. हळद

हळद ही केवळ स्वयंपाकासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठीच नाही तर आरोग्यविषयक समस्यांवरही उपयुक्त ठरते. हळदीच्या सेवनामुळे घसा साफ होण्यास मदत मिळते. घसा दुखत असल्यास एका गरम पाण्यात एक चमचा हळद मिसळून या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. तसेच हळद घालून गरम दुधात प्यायल्यासही छातीतील कफ कमी होतो.

3. आलं-
आजीच्या बटव्यातील महत्वाचा पदार्थ म्हणजे आलं. तिखटं चवीच्या आल्यामध्ये पॉलिफिनोसचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. पॉलिफिनोसमुळे छातीत जमा झालेला कफ मोकळा होतो.

4. पाणी पीत राहावे –
कफ झाल्यास कोमट पाणी पीत राहावं. त्यामुळे घशात निर्माण होणाऱ्या कफाचं प्रमाण कमी होते. लिंबूपाणी किंवा लेमन टीसारखे पेय पिऊन
शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य ठेवू शकता, तसंच घसाही ओलसर राहण्यास मदत होते.

5. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या –
कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. घशात जमा झालेला कफही हटण्यास मदत होते. घशातील जीवाणू मरतात.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *