‘आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळेल’ : उपमुख्यमंत्री अजित पवार

क्राईम मुंबई
Spread the love

साथी ऑनलाईन

हिंगणघाटमधील जळीतकांड पीडितेचा संघर्ष अखेर थांबला असून पीडितेवर सोमवारी सायंकाळी पाच वाजता दारोडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. कुटुंबियांना यावेळी आपला शोक आवरता आला नाही. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिकिया व्यक्त केली आहे.
आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल. पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत
बहिणीला आपली आदरांजली असेल. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिले पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच
मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *