आ.निलेश लंके आयोजीत पारनेर येथील जनता दरबारात शेकडो तक्रारींचे निवारण

राजकारण

पारनेर : साथी ऑनलाईन

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अधिकारी व नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी व सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागण्या साठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करणार असे आमदार लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत घेतलेल्या बैठकीत नमूद केले होते.  सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी पारनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.सदर जनता दरबारात, शेकडो तक्रार अर्ज दाखल झाले व प्रत्येक अर्जाचे संबंधित शासकीय अधिकाऱ्यां समवेत सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमदार लंके यांनी केला.व त्यातील अनेक प्रकरणे जनता दरबारात मार्गी लावले.
महसूल विभागाच्या अंतर्गत प्रलंबित सात बारा नोंदी व दुरूस्ती शिधापत्रिका, फेरफार दुरूस्ती सह रस्ते व जमीन वाटपा संदर्भात गावागावात मोठ्या प्रमाणात तक्रारी असुन याबाबत तक्रारींचा पाऊस या जनता दरबारात पडला आहे.त्यामुळे महसूल विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा या जनता दरबारात करण्याचा प्रयत्न तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे.तर दुसरीकडे आ.निलेश लंके यांच्या जनता दरबारात सर्वच  विभागाच्या शेकडो तक्रारी प्राप्त झाल्याने या जनता दरबाराच्या माध्यमातून निपटारा होईल असा आशावाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे.  महसूल विभागाच्या रस्ता केससह व प्रलंबित सात बारा नोंदी वाटप व जमीनी सह दुरूस्ती इतर अनेक गावांच्या तक्रारींचा पाऊस या जनता दरबार झाला आहे. तसेच पारनेर पंचायत समिती सह पाटबंधारे विभाग, महावितरण, ग्रामपंचायत,आरोग्य विभाग,पोलिस या विभागाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकारांना सांगुन जास्तीत तक्रारींचा निपटारा या जनता दरबारात करण्यात आला आहे.
आमदार लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनता दरबार मुळे प्रशासन व सामान्य जनता यांचा जो समन्वय साधला गेलाय त्याबद्दल तहसीलदार ज्योती देवरे व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

महसूल विभागाच्या वतीने पारदर्शक कारभार येण्यासाठी ऑनलाईन संगणकीय सात-बारा तयार करण्यात आला आहे.परंतु गावनिहाय सात-बाराची नोंद करताना कामगार तलाठ्यां कडुन नाव दुरूस्ती व क्षेत्र दुरूस्तीची अनेक तक्रारी प्रलंबित आहे.त्यामुळे अनेक नोंदी प्रलंबित असुन या ऑनलाईन सातबारा मध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.तर दुसरीकडे नविन रेशनकार्ड सह धान्य मिळत नसल्याने तक्रारी करण्यात आल्या आहेत.
गेल्या महीन्यात पहील्या सोमवारी २३४ तक्रारी या जनता दरबारात आल्या होत्या त्यापैकी २३१ प्रकरणांचे निवारण या जनता दरबारात करण्यात आले. त्याची तपसीलवार माहीती पुढील प्रमाणे. तहसील कार्यालयातील ११८ प्रकरणा पैकी सर्व ११८ प्रकरणांवर कार्यवाही झाली असुन लवकरच हे सर्व प्रकरणे मार्गी लागतील आसे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगीतले.पंचायत समीती कार्यालयातील एकुन ४३ तक्रारी आल्या होत्या पैकी सर्व ४३ तक्रारींचे निवारण करण्यात आले आसे गट विकास अधिकारी किशोर माने यांनी सांगीतले. महावितरण कार्यालयातील २९ तक्रारी या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले असे उप आभियंता आडभाई यांनी सांगीतले.पोलीस स्टेशनचे १४ पैकी १३ तक्रारीचे निवारण करण्यात आले.भूमी अभिलेख ८ पैकी ६ ,कृषी कार्यालय ७, नगर पंचायत ८, सार्वजनिक बांधकाम विभाग ७ या सर्व विभागांच्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले.
या जनता दरबारात आमदार निलेश लंके यांनी सर्व तक्रारीमध्ये स्वतः लक्ष घातले या वेळी त्यांच्या समवेत तहसीलदार सौ. ज्योती देवरे,गट विकास अधिकारी श्री.माने,देवकुळे, रामदास दरेकर, आडभाई,धृपद, गायकवाड,भोसले या प्रशासकीय आधिकाऱ्यां सह सुदामराव पवार, सुरेश धुरपते,बापु शिर्के,अॅड.राहुल झावरे,कारभारी पोटघन,विजय औटी,श्रीकांत चौरे, ठकाराम लंके,दत्ता आवारी,जयसिंगभाऊ मापारी, डॉ.बाळासाहेब कावरे,बाळासाहेब लंके,सौ.सुवर्णा ताई धाडगे,विलास सुर्यवंशी,संग्राम ईकडे,प्रकाश गुंड,राजेंद्र खोसे,संदीप सालके अरूण पवार,पोपट गुंड,पोपट पिसाळ,संदीप चौधरी,संदीप ठाणगे राजू रोकडे,भाऊ रासकर यांच्या सह निलेश लंके प्रतिष्ठान,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधीकारी सदस्य, सर्व विभागांचे अधिकारी,सर्कल, तलाठी,ग्रामसेवक व आपल्या तक्रारी घेऊन आलेले आनेक तरूण,वृध्द व सर्वसामान्य जनता या वेळी या जनता दरबारात उपस्थित होते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *