लघुउद्योग व गृहनिर्माण क्षेत्राला सवलती देण्याची ललित गांधी यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

अर्थसत्ता

अहमदनगर  ; साथी ऑनलाईन
केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसाधारणपणे स्वागत करण्या योग्य असला तरीही रोजगार निर्माण निर्मिती व अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता असलेल्या वस्त्रोद्योग, गृहनिर्माण व लघुउद्योग क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन फिक्की चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले. अर्थसंकल्पानंतर व्यापारी उद्योग जगताच्या अपेक्षा व भावना जाणून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी अर्थ खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फिक्की द्वारे आयोजित बैठकीत सहभाग घेतला. तसेच देशाच्या
अर्थव्यवस्थेला गती देण्याची जबाबदारी ही व्यापार-उद्योग क्षेत्राची असून त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य सरकारने करावे व व्यापार-उद्योग जगतावर पूर्ण विश्वास ठेवून अर्थव्यवस्था गतिमान करावी अशी सरकारची भूमिका असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले.करदात्याला प्रतिष्ठा देण्याची सरकारची ठाम भूमिका असून प्रामाणिक करदात्याला प्रोत्साहन दिले जाईल अशी भूमिका केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनी मांडली.
अर्थसंकल्प तयार करताना असलेली सर्व आव्हाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढवण्याचे उद्दिष्ट या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प बनवला गेल्याची तसेच यासाठी सर्व संबंधितां समवेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रदीर्घ कालावधीची चर्चा केली असल्याची माहिती देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के.सुब्रमण्यम यांनी दिली.
फिक्कीच्या अध्यक्षा संगीता रेड्डी यांनी व्यापार-उद्योग जगताच्या वेगवेगळ्या मागण्या अर्थमंत्र्यांपुढे मांडल्या. फिक्कीचे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्र व लघु उद्योग क्षेत्राला विशेष सवलत
देण्याची आवश्यकता आग्रही पणे मांडली. तसेच याविषयीचे व आढळून आलेल्या विरोधाभासी तरतुदी बद्दलचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिले. अर्थमंत्र्यांनी या मागण्यांचा तसेच अर्थसंकल्पातील विविध बाबी वरील केल्या गेलेल्या मागण्यांचा योग्य तो विचार केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवली जाईल असे सांगून सर्वांनी मिळून देशाची अर्थव्यवस्था गतीमान करूया असा संकल्प व्यक्त केला. अशी माहिती जैन माइनोरिटी फेडरेशन चें महाराष्ट्र कमीटि मेंबर इंजी. यश प्रमोद शहा यांनी दिली. यावेळी अर्थ खात्याचे अन्य सचिव टी.
के. पांडे अर्थ खात्याचे महसूल सचिव अजय भूषण पांडे यांच्यासह अर्थ विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग जगतातील विविध मान्यवर उपस्थित होते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *