ग्लोबल नगरी उपक्रमा अंतर्गत सांडवे गावातील विद्यार्थ्यांनी साधला अमेरिकेत संपर्क

देश-विदेश

 

अहमदनगर ; साथी ऑनलाईन

नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांडवे येथील विद्यार्थ्यांनी ग्लोबल नगरी उपक्रमांतर्गत सध्या न्यू जर्सी अमेरिकेत वास्तव्यास असणारे सन्माननीय बाबासाहेब काळे यांच्याशी संपर्क साधला. शिक्षणाधिकारी काठमोरे तसेच गटशिक्षणाधिकारी कापरे व चिचोंडी पाटील केंद्राचे केंद्रप्रमुख चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय बोरुडे आदी उपस्थित होते. शाळेतील विद्याथ्यांनी आपल्या बालमनातील शंका, विचारल्या,पालक व शिक्षक यांनी सकाळी नऊ ते साडे दहा पर्यंत सुसंवाद साधला कार्यक्रम अतिशय छान पार पडला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भावसार मॅडम तसेच ग्लोबल नगरी उपक्रमाच्या सदस्या वसुधा दहातोंडे, श्रीमती संगिता कडू, कांबळे सर, कुलट सर, चौधरी मॅडम, करंडे सर,आरती शिंदे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *