हिंगणघाट पीडितेचा खर्च उचलणार उद्योगपती आनंद महिंद्रा

क्राईम मुंबई
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारच्यावतीने पीडितेची बाजू मांडणार आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर आता जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या उपचारांचा खर्च उचलण्याची तयारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवली आहे. ‘पीडित तरुणीला वा तिच्या कुटुंबीयांना कुणी ओळखत असतील तर कृपया त्यांची माहिती मला द्या,’ असे आवाहन आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *