समान पाणी वाटपासाठी उद्या औरंगाबादेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक – आ. बंब

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, समान पाणी वाटप करण्यात यावे, मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढून ठोस उपाययोजना करण्यासाठी रविवार, दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मराठवाडा विभाग स्तरीय बैठक
आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत बंब यांनी दिली. आ. प्रशांत बंब यांनी सांगितले की मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न कायम आहे तो मार्गी लावण्यासाठी ही बैठक होत असून दुपारी बारा वाजता हॉटेल अजंता अॅम्बेसेडर येथे ही पाचवी बैठक होत आहे. गेल्या काही वर्षात मराठवाड्यात आणि राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि प्रश्नीलवादाने जायकवाडीपर्यंत  आणि खालच्या क्षेत्रात दीडशे दलघमी फूट दाखवली आहे. दरम्यान पाणीप्रश्नावर
राज्यपालांसोबतही बैठका झाल्या असून मराठवाड्यासाठ 115 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत 13 ते 17 धरणे पद्धतीने जोडली जाणार आहेत आणि प्रश्न त्यांची गरज या संदर्भात सर्वेक्षण पूर्ण झाले असून आतापर्यंत चार
निविदा काढण्यात आल्या. 19 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाला अनुसरून समितीने प्रत्यक्ष कामही सुरू केले. दोन वर्षात हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. आगामी काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले. मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर असून सततच्या दुष्काळामुळे  त्याचे स्वरूप अधिक तीव्र झाले आहे.  यावेळी बोलताना आमदार बंब यांनी शर्मा कमिटीवर चांगले काम झाले नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली या बैठकीत जलनीती व आराखडा 2005 वॉटर बोर्ड कौन्सिल यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून बैठकीत फलित निघेल असा आत्मविश्वास आमदार बंब यांनी व्यक्त केला सर्वपक्षीय बैठकांसाठी आमदार-खासदार उपाध्यक्षांनी निमंत्रण पाठवून व्यक्तिगत पातळीवर संपर्क करण्यात येत आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *