वर्धापन दिनाच्या निमित्ताने…

संपादकीय
Spread the love

आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक भारताचा व दैनिक मराठवाडा साथीचा वर्धापन दिन. देश पुढे जातोय अगदी तसाच
आपल्या सर्वांच्या सहकार्याने मराठवाडा साथी हे वृत्तपत्र सुद्धा आणखी पुढे जात आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन हा देशभर
आज साजरा केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार देशाच्या आर्थिक, औद्योगिक प्रगतीसाठी कार्यरत
आहेत. देशात सध्या आर्थिक प्रगतीबाबत काहीसे उदासिन वातावरण असून डॉलरच्या तुलनेत दिवसेंदिवस रूपया घसरत
चालला आहे. या आर्थिक स्थितीवर सुधारणा आणण्याचे काम सरकारला करायचे असून आपणही त्यांना साथ द्यायला हवी.
आज खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या व स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असणाऱ्या सर्वांचे स्मरण करून
त्यांना आम्ही अभिवादन करीत आहोत.

बीड जिल्ह्यात 40 वर्षापूर्वी स्व.मोहनलालजी बियाणी यांनी मराठवाडा साथी या वृत्तपत्राचे रोपटे लावले. आम्ही हे रोपटे
आपल्या मदतीने वटवृक्षात रूपांतर करण्याचे दृष्टीकोनातून कार्यरत आहोत. एकेकाळी फार मोजकीच वृत्तपत्रे बीड जिल्ह्यात कार्यरत होती. आज अंकांची संख्या वाढली असली तरी मराठवाडा साथीने केवळ गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण बीड जिल्ह्यात आपले जाळे पसरविले आहे. बीडसह मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद, परभणी व जालना अशा चार आवृत्तींच्या माध्यमातून मराठवाडा साथी वाचकांच्या सेवेत कार्यरत आहे. सर्वच ठिकाणी आठ पानी वृत्तपत्रे असून आपआपल्या
जिल्ह्यातील मुलभूत प्रश्नांचा उहापोह आम्ही या दैनिकाच्या माध्यमातून करीत आहोत. आपले वृत्तपत्र सामान्य वाचकांच्या
अपेक्षेला कसे पूर्ण करेल, या पध्दतीने काम करावे असा मुल मंत्र दिवंगत संपादक मोहनलालजी बियाणी यांनी दिला होता.
या मुलमंत्रावरच आमचे काम सध्या चालू आहे. बीड जिल्ह्यात ब दर्जा असलेले मराठवाडा साथी हे दैनिक असून राज्य व
राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांसोबतच जाहीरातीचाही मराठवाडा साथी केंद्रबिंदू राहिलेला आहे. आठ पानात चार पाने रंगीत
आम्ही देत असून भविष्यात आणखी काही पाने रंगीत देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शासकिय स्तरावर असलेल्या
विविध योजना आणि उपक्रमांची सर्वाधिक प्रसिद्धी मराठवाडा साथी देत आहे. येत्या काळात बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण
विकासासंदर्भात आम्हाला लिहायचे आहे. मराठवाडा साथी वाचकभिमूख वृत्तपत्र असून हा वसा आणि वारसा पुढे जपायचा,
वाढवायचा आणि सर्वांचा स्नेह आणखी वृद्धींगत करायचा आहे. बीड जिल्ह्याला अभिप्रेत असलेल्या

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *