अरूण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

राजकारण

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार काल बहाल करण्यात आला.  तर क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खासदार मेरी कोम, छन्नुलाल मिश्रा, अनेरूद जुगुनाथ जीसीएसके, विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानेगौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावाची केंद्र सरकारच्यावतीने घोषणा करण्यात आली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *