हे प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे देणे घटनाबाह्य : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

कोरेगाव भीमा हिंसाचार व एल्गार परिषदप्रकरणी नव्याने चौकशी करा आणि विशेष तपास पथका (एसआयटी)ची स्थापना करा असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यांनतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास  करण्याची जबाबदारी एनआयएकडे दिली आहे.  त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला सवाल केला आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारला न विचारता हे प्रकरण एनआयएकडे देणे हे घटनाबाह्य आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची खोलवर तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने या प्रकरणात हात घालून राज्य सरकारला न विचारता हे प्रकरणात एनआयएकडे दिले आहे. या घटनेचा मी निषेध करतो. या प्रकरणात केंद्र सरकारला कोणालातरी वाचवायचे आहे. असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *