७ मार्च ला मुख्यमंत्री अयोध्येत जाणार

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्च ला अयोध्येत जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना -बीजेपी ला स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-बीजेपी युती तुटली, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उशीर झाला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण होताच अयोध्येला जातील अशी घोषणा केली होती. त्यांनी आज पुन्हा एकदा नेमकं कोणत्या दिवशी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत याबाबत सांगितले आहे.

येत्या ७ मार्च ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार आहेत. त्यानंतर ते रामलल्लाचं दर्शन घेतील, शरयू तीरावर आरती करतील. असं सांगितलं आहे . अयोध्येचं कोणीही राजकारण करू नये. हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. या दौऱ्याच्या वेळी हजारो शिवसैनिक देशभरातून येतील अशीही माहिती राऊत यांनी दिली आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *