औरंगाबादेत ‘वंचित’च्या बंद ला चांगला प्रतिसाद

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व कायदा आणि एनसीआर च्या विरोधात बंदचे आवाहन केले होते. या अावाहनाला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला असून गेवराई ता.औरंगाबाद व शहरातील पंचवटी चौकात बसवर अज्ञात तरूणांकडून दगडफेक करण्यात आली या किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला दलित -मुस्लिम बहुल भागातून प्रतिसादा मिळाला. वंचित बहुजन आघाडी व अन्य ३५ संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला
औरंगाबाद जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद पहावयास मिळाला. औरंगाबादेत सकाळी उस्मानपुरा, पीरबाजार, हर्सुल टी पाँईट, एकतानगर, आंबेडकरनगर या सह औरंपुरा, गुलमंडी, निराला बाजार याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अिमत भुईगळ यांच्या
नेतृत्वाखाली दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते विनंती करत होते. शहरभर व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. पदमपुरा येथील पंचवटी हॉटेल चौकात वाळूजकडे जाणाऱ्या शहर वाहतूक बसवर
अज्ञात तरूणांकडून दगडफेक करण्यात आाली. यावेळी बसच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या बंदला ग्रामिण भागातूनही समिश्र प्रतिसाद मिळाला. पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड तसेच फुलंब्री व सोयगाव या तालुक्यामध्येही जनजीवन सुरळीत होते. दुपारच्या सुमारास पैठण – औरंगाबाद रोडवरील गेवराई येथे एसटी महामंडळाच्या बसवर अज्ञात
तरूणांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या सुदैवाने प्रवासी यात बचावले. शहरातील काही प्रमुख दलित वसाहतीमध्ये कडकडीत बंद होता, तर अन्य भागात दुकाने, शाळा, महाविद्यालये नियमित सुरु होती. या बंदला शहरात संमीश्र प्रतिसाद मिळाला. हा बंद यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष महेश निनाळे, महिला आघाडीच्या लता बमणे, वंदना नरवडे, विलास भिसे, एस.पी.मगरे, संदीप कंठे आदींचा सहभाग होता.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *