मशिदीवरील भोंग्याचा राज ठाकरेंना आत्ताच का त्रास होतोय : इम्तियाज जलील

मुंबई राजकारण

मुंबई: साथी ऑनलाईन

काल मनसेच्या पहिले अधिवेशन मुंबईत पार पडले. त्यावेळी राज ठाकरे यांनी नमाजाच्या वेळी वाजणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. प्रत्येकाने आपला धर्म पळाला पाहिजे, पण लोकांना त्याचा त्रास होता काम नये असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं होत.

त्यांच्या या व्यक्तव्यावर एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी आमच्या आरत्या आम्ही घरात करतो. आमच्या आरत्यांचा तुम्हाला त्रास नाही. मग तुम्हाला नमाजाच्या वेळी मशिदीवर भोंगे कशाला हवेत ? तुमचा धर्म घरात ठेवा. त्याचा लोकांना त्रास होता काम नये. असं व्यक्तव्य केलं होत. त्यावर प्रतिक्रिया देताना एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरेंना राजकारणात बरेच दिवस झाले आहेत. इतके दिवस त्यांना मशिदीवरील भोंग्याचा त्रास नाही झाला. आत्ताच त्यांच्या कानाला का त्रास होतोय असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला. मनसे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा प्रेतायतन करत आहे. परंतु लोक आता हुशार झाली आहेत. त्यामुले राज ठाकरे यांनी जरा विचार करून बोलावे असा टोला जलील यांनी राज ठाकरेंना लगावला.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *