न्यूझीलंड वर भारताचा दणदणीत विजय

खेळ जगत

भारत आणि न्यूझीलंड यांच्या तील टी-२० मालिकेला आज पासून सुरवात झाली आहे. आज पहिला टी-२० सामना ऑकलंड येथे सुरु आहे. भारताने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली . भारताचा कप्तान विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु न्यूझीलंड च्या फलंदाजांनी विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरवत भारतापुढे २०३ धावांचा डोंगर उभा केला. गप्टिल १९ चेंडूत ३० आणि मुनरो ४२ चेंडूत ५९ धाव करत संघाला ताबडतोब सुरवात करून दिली. नंतर विल्यम्सन ने २६ चेंडूत धावगती वाढवत ने ५१ धाव केल्या. रॉस टेलर ने ५४ धाव २७ चेंडू खेळून संघाला २०३ एवढा विशाल स्कोर उभा करून दिला.

भारतीय बल्लेबाज रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामी जोडीने डावाची सुरवात केली. रोहित शर्मा लवकरच ७ धावा काढून संटनर च्या चेंडूवर रॉस टेलर कडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला आणि के. एल. राहुल सोबत संघाला सावरण्याचा प्रयत्न केलं. राहुल २७ चेंडूत ५६ धाव करून इश सोढी चा शिकार ठरला. तर कोहली ४५ धाव करून ब्लेअर टिकनेर च्या चेंडुवर आपली विकेट गमावली. मधल्या फळीत स्रेयस अय्यर जलद धावा करत ५८ धावांची खेळी केली. त्याला मनीष पांडे ने १४ धावा करत चांगली साथ दिली. भारताने एक ओव्हर राखून या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंड च्या गोलदाजानी संटनेर १, टिकनेर १, तर ईश सोढीने २ विकेट्स मिळवल्या. एकूणच भारताने न्यूझीलंड वर दणदणीत विजय मिळवला

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *