न्यूझीलंड चा भारतापुढे २०३ धावांचा डोंगर

खेळ जगत

मुंबई : साथी ऑनलाईन

भारत आणि न्यूझीलंड यांच्या तील टी-२० मालिकेला आज पासून सुरवात झाली आहे. आज पहिला टी-२० सामना ऑकलंड येथे सुरु आहे. भारताने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली . भारताचा कप्तान विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु न्यूझीलंड च्या फलंदाजांनी विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरवत भारतापुढे २०३ धावांचा डोंगर उभा केला.

सलामीला आलेले गप्टिल १९ चेंडूत ३० आणि मुनरो ४२ चेंडूत ५९ धाव करत संघाला ताबडतोब सुरवात करून दिली. त्यानंतर विल्यम्सन ने २६ चेंडूत धावगती वाढवत ने ५१ धाव केल्या. रॉस टेलर ने ५४ धाव २७ चेंडू खेळून संघाला २०० च्या पुढे नेण्यास मदत केली.  भारतीय गोलंदाजांची मात्र या सामन्यात चांगलीच दमछाक झाली. जसपीत बुमराह, शार्दूल ठाकूर, चाहल, रवींद्र जडेजा, आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली. तर मोहमद शामिल मात्र एकही विकेट्स मिळाली नाही. त्याच्यावर ५३ धाव देण्याची नामुष्की ओढवली आहे. भारतीय फलंदाज कश्याप्रकारे हे आव्हान पार करतील हे बघावे लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *