हिवाळ्यात खाण्यासाठी उपयुक्त फळे कोणती ? वाचा !

आरोग्य

हिवाळ्यामध्ये चांगल्या आहाराची आपल्या शरीराला अत्यतंत आवश्यक्यता आहे. त्याचबरोबर फळ खाल्याने तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. हिवाळ्यात प्रामुख्याने कोणती फळ खायची याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. सीताफळ

सीताफळामध्ये असलेले आयर्नामुळे अॅनिमियाचा त्रास कमी होतो. गरोदर महिलांनी सीताफळ खाल्ल्याने फायदा मिळतो, गरोदर महिलांनी रोज सीताफळ खाल्ल्याने गर्भाचा विकास होतो आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, यामध्ये मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम असते, त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हार्टअटॅक आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

2. चिकू

यामध्ये असलेल्या अंतर्भूत गुणामुळे अनेक आजारापासून आपला बचाव केला जातो, या फळामुळे बद्धकोष्टता, अतिसार, अशक्तपणा आणि हृदय रोगापासून बचाव होतो. याशिवाय यूरेन इन्फेक्शन दूर होते. यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्यामुळे चिकू शेक एनर्जी ड्रिंक म्हणून पिले जाऊ शकते.

3. डाळिंब

3. डाळिंबामध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट्स असते त्यामुळे कँसर, हार्ट अटॅक आणि डिप्रेशन सारख्या अाजारात दिलासा मिळतो. गर्भवती महिलांसाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते, हे फळ अशक्तपणा दूर करण्यास मदत करते, डाळिंब त्वचेसंबंधी समस्या जसे पिंपल्स आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करते, तसेच पोटाच्या समस्या दूर होतात. वंध्यत्व सारख्या समस्यादेखील दूर होतात.

4. पेरू

यामध्ये फोलेट, फायबर्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हिवाळयात होणारी पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत होते, पेरू खाल्ल्याने शुगर बरोबरच सीरम टोटल कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसेराइड्स आणि एलडीएल कोलेस्टेरॉल नियंत्रित राहाते.

5. संत्री

संत्र्यामध्ये विटॅमिन्स असते जे त्वचेवरील सुरकुत्यापासून बचाव करते. त्वचेच्या कोरडेपणा पासून बचाव होतो. संत्री खाल्ल्याने वयाचा वाढता प्रभाव कमी करता येतो. यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखे आजार कमी करण्यास मदत मिळते.

6. पपई

पपई खाल्याने शरीरातील उष्णता वाढते, मासिक पाळीच्या समस्या दूर हाेतात, पपईमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे बद्धकोष्ठता किंवा अपचन सारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयोगी आहे, पपई नियमित खाल्ल्याने शरीरात वाढलेले कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवली जाऊ शकते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *