वंचितची आज महाराष्ट्र् बंद ची हाक

मुंबई राजकारण

मुंबई : साथी ऑनलाईन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सीएए व एनआरसी विरोधात महाराष्ट्र बंद चे आज शुक्रवारी  आव्हान केले होते.  वंचित आघाडी याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टात आज शांततेत बंद पाळण्याचे आव्हान वंचित आघाडीकडून करण्यात आले आहे.

यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत व्हाव्हा असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. सीएए व एनआरसी लागू करण्यासाठी सरकार दडपशाही करत आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही सरकार मात्र याच्यावर काही विचार करत नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत बंद पळला जातोय. सकाळी मुंबईत चेंबूर येथे बस च्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बसच्या काचा फोडफणारे कार्यकर्ते वंचितचे नाहीत असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *