जशास तसे उत्तर देणार : राज ठाकरे

मुंबई राजकारण

मुंबई : साथी ऑनलाईन

मनसे महाआधिवेशनात राज ठाकरे यांनी संध्याकाळी आपली भमुक मांडली ते म्हणाले आपला देश म्हणजे एक धर्मशाळा होऊ पाहत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोर आपल्या देशात मोठ्या संख्येने आहेत. भारतात अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत. त्यामुळे आतच मोठा धोका निर्माण झाला आहे. उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर भारतीय सैन्याला आतल्याच शत्रूंशी आधी लढावे लागेल.

त्यामुळे एनआरसीचे नंतर बघू आधी पाकिस्तान सोबतची समझोता एक्सप्रेस आणि बससेवा बंद करा. पाकिस्तान सोबत आपल्याला संबंध हवेतच कशाला, असे सांगतानाच काश्मीर आणि राम मंदिराचा राग काढण्यासाठीच सीएएला विरोध करणारे मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चात आतले आणि बाहेरचे मुसलमान किती होते हे आधी तपासा. या मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिले पाहिजे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी व्हा, असे वाहन राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना केले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *