धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील आता राष्ट्रवादीत

मुंबई राजकारण

मुंबई : साथी ऑनलाईन

मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नरेंद्र पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान गेल्या सप्टेंबरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत महाअधिवेशन सुरु असताना नरेंद्र पाटील यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

देवेंद्र फडणवीस महाराष्टाचे मुख्यमंत्री असताना धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाख रुपये देऊन औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने मला योग्य मोबदला दिला नाही. असा आरोप धर्मा पाटील यांनी केला होता. वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करत धर्मा पाटील यांनी यांनी मंत्रालयात तक्रार केली मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये प्रवेश केला होता. परंतु आज ज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत महाअधिवेशन सुरु असताना नरेंद्र पाटील यांनी मनसेला राम राम करत उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या उपस्थतीत आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *