योगासने केल्याने शरीराला होतात हे फायदे

आरोग्य

साथी ऑनलाईन

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपले शरीराकडे दुर्लक्ष्य होत आहे. मात्र शरीर नेहमी फिट्ट असण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण योग्य योगासने केली तर आपण आयुष्यभर फीट राहाल. यामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. फक्त शारीरिक स्वास्थ्य असून चालणार नाही, तर मानसिक स्वास्थ्यही गरजेचे आहे.

आसने, प्राणायाम (श्‍वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यानधारणा या गोष्टी उत्तम आरोग्य राखायला उपयोगी पडतात.सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याचा अंदाज आपल्याला येतो.आपली यंत्रणा ही शरीर, मन आणि आत्मा या तिघांपासून बनलेली असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात, तसेच मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात.

योगासने केल्याने फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत. योगासने करून आपण आयुष्यभर निरोगी आणि फीट राहाल.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *