अमित ठाकरे मनसेच्या नेतेपदी

मुंबई राजकारण

मुंबई : साथी ऑनलाईन
मुंबईत सुरु असलेल्या मनसेच्या महाअधिवेशनात आज अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर  यांनी हा प्रस्ताव मांडला. गेल्या अनेक दिवसापासून अमित ठाकरे हे सक्रिय काम करताना दिसत होते. परंतु आज त्यांची पक्ष्याच्या नेतेपदी निवड झाल्याने ते यापुढे मात्र सक्रिय राजकारणात दिसणार असल्याचे संकेत आहेत.

त्यानंतर अमित ठाकरेंनी मंचावर येत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले मला राजसाहेबांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. मी ठराव मांडणार असल्याचं त्यांनी मला काळ संध्याकाळी सांगितलं. त्यावेळी माज्या पायाखालची जमीन सटकली. येत्या दोन महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे आपण 14 वर्षं पकडूनच चालू. 14 वर्षांतलं हे पहिलं अधिवेशन असून, मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलतो आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याचा हा खूप मोठा दिवस आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.आतापर्यंत मला जे प्रेम आणि प्रतिसाद दिलात तो यापुढेही द्याल, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो.

त्यानंतर त्यांनी शिक्षण ठराव मांडला , सर्वसामान्यांना परवडणारी आणि गुणवत्तेच शिक्षन मिळण्यासाठी शिक्षण प्रणालीची पुनर्रचना व्हावी. हान मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात जागतिक स्तराचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू व्हावेत असे मुद्दे त्यांनी मांडले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *