मनसेचा नवीन राजमुद्रेचा ध्वज वादाच्या भोवऱ्यात

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

राजमुद्रेचा झेंड्यावर वापर केल्यास राजमुद्रेचा अपमान होऊ शकतो परिणामी सर्वसामान्य जनतेच्या भावना दुखावल्या
जाऊ शकतात. त्यामुळे मनसेकडून राजमुद्रा ध्वजावर घेतल्यास त्यास कायदेशीरपणे काय करता येईल का ते पाहण्यात
येणार आहे. यासाठी कायदेशीर लढा उभारण्याची तयारी केल्या जाईल असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सांगितले.

दरम्यान निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून आपला पक्षध्वज बदलण्याची चर्चा राज्यात सुरू असताना आता या ध्वजासंदर्भात वाद निर्माण झाला असून या संदर्भात मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याचे
कळते आहे.राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रतिक आहे. त्यामुळे कोणीही राजमुद्रेचा वापर
राजकारणासाठी करू नये अशी मागणी मराठा संघटनेकडून केल्या जात आहे. यासंदर्भात िवनोद पाटील यांनी मनसेप्रमूख
राज ठाकरे यांना पत्रही पाठविले होते परंतु त्या पत्राचे अद्यापही उत्तर मिळाले नाही. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा घेऊ नये
यासाठी विनोद पाटील आक्रमक झाले आहे.

कोणत्याही पक्षाला विरोध नाही मात्र राजमुद्रेचा वापर राजकीय पक्षांनी टाळावा. राजमुद्रा झेंड्यावर घेतल्यास राजमुद्रेचा अपमान होवू शकतो तसेच त्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात यासर्व बाबीपाहता मनसेकडून राजमुद्रेचा वापर केल्यास
याविरोधात कायदेशीरपणे काय करता येणार ते तपासून पाहण्यात येईल व वेळप्रसंगी हा मुद्दा राज्य सरकार व केंद्र
सरकार समोर नेला जाईल असे पाटील पुढे म्हणाले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *