पोलिसांच्या मदतीला आता अश्व दल

औरंगाबाद संपादकीय

संपादकीय : साथी ऑनलाईन

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केलेल्या मुंबईतील नाईट लाईफ या महत्वकांक्षी योजनेला गृहमंत्री अनिल
देशमुख यंानी विरोध केला असून या योजनेमुळे पोलिस खात्यावर अतिरिक्त ताण पडणार असल्याचे देशमुखांनी म्हटले आहे.
नाईट लाईफची योजना पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असली तरी तिच्यामुळे शासकिय यंत्रणावर किती ताण पडणार आहे. याचा
सर्वांगिण विचार करून सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. नाईट लाईफ योजनेबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असतांनाच
मुंबई पोलिस दलात गुन्हेगारीवर व गर्दीच्या ठिकाणी आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीला आता अश्वदलाचा समावेश
करण्यात येणार आहे. बृह्ममुंबई पोलिस दलात तब्बल 88 वर्षांनी पुन्हा अश्र्व दलाचा (माऊंटेड पोलिस युनिट) समावेश करण्यात येणार आहे. 26 जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील पोलिस संचलनात अश्व दलाचे पथक सहभागी होणार आहे.

मुंबई पोलिस दलाच्या अश्व दल वाहतुक नियंत्रण गर्दीच्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील चौपाटी सारख्या गर्दीच्या ठिकाणावर अश्व दलाची गस्त वाढवण्यात येणार आहे. मुंबई पोलिस दलातून 88 वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 1932 मध्ये बंद करण्यात आले होते. राज्य शासनाने अश्व दलासाठी 30 अश्व 1 पोलिस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 4 पोलिस हवालदार आणि 32 पोलिस शिपाई यांची नियुक्ती केली असून त्याला मंजूरी दिली आहे. सध्या अश्व दलात 13 जातीवं अश्व खरेदी करण्यात आले असून आगामी सहा महिन्यात पूर्ण दलाची निर्मिती करण्यात येणार आहे.

अश्व दलातील अश्वाला पूर्ण सुख सोयी व व्यवस्था करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी पोलिसांच्या मदतीसाठी विशेष अश्व दलाचा समावेश केला आहे. या निर्णयाचे स्वागत करावे वाटते. पण एक प्रश्न निर्माण होतो आपण 21 व्या शतकात वाटचाल करीत असताना विज्ञानाच्या सहाय्याने गुन्हेगारावर निर्बंध घालण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात येत असताना 88 वर्षापूर्वी पोलिस खात्यातून काढून टाकलेला अश्व दलाचा समावेश पुन्हा करण्याची काय गरज पडली. अति जलद व वेगाने धावणाऱ्या  वाहनापेक्षा सरकारने अश्व दलाची मदत का घ्यावी लागली. आले राजाच्या मना त्यापुढे कोणाचे काही चालेना असे म्हणतात. राज्य सरकार जनतेच्या हितासाठी ज्या नविन योजना लागू करीत आहे. त्याची आवश्यकता किती आहे याचा विचार न करता सर्रास नविन योजना लागू करण्यात येत आहेत. मुंबईकरांसाठी नाईट लाईफ योजना असो, पोलिसांच्या मदतीसाठी अश्व दल समावेश असो, यावर गांभिर्याने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे, असे वाटते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *