विधानसभा निवडणूकीत भाजपने घात केला : अर्जुन खोतकर

जालना राजकारण

जालना : साथी ऑनलाईन

लोकसभा निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी केलेली असताना आणि कारक्य र्त्यांची तशी इच्छा असताना केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला मानून मी त्यावेळी माघार घेतली आणि रावसाहेब दानवे यांच्या
विजयासाठी तन मन धनाने प्रयत्न केला.मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने काम केले नाही. खालच्या पातळीवरच्या भाजपने दगा फटका केला, असा थेट आरोप शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर
यांनी यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या या आरोपानंतर दानवे – खोतकर यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

भाजप – शिवसेनेची लोकसभा निवडणुकीपूर्वी युती होण्याची शक्यता नसताना खा. रावसाहेब दानवे आणि
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय संघर पे ्ष टला होता. यातूनच खोतकर यांनी
लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तयारी केली होती. मात्र, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने खोतकर यांनी माघार घेतली होती. त्यानंतर दानवे यांच्या संपूर्ण प्रचाराची धुरा खाद्यावर घेत खोतकर यांनी दानवे यांना विक्रमी मतांनी
विजय मिळवून दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र, खोतकर यांचा दणदणीत पराभव झाला. आता राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी काँग्स रे – काँग्स प रे क्षाचे सरकार सत्तेवर आल्याने भाजप – शिवसेनेचे पुन्हा बिनसले आहे. त्यातच आता चार महिन्यांनंतर अर्जुन खोतकर यांनी आपल्या पराभव कुणामुळे झाला, हे जाहीरपणे सागिं तले आहे.

शिवसेनेने भाजपला मदत केली तशी मदत भाजपने विधानसभा निवडणुकीत केली नाही,उलट भाजपने दगा फटका केला. यामुळेच माझा पराभव झाला, असा थेट आरोप खोतकर यांनी केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत दानवे माझ्यासोबत फिरले मात्र कारक्य र्त्यांनी काम केलं नसल्याचा आरोप खोतकरांनी केला आहे. वरच्या पातळीवर दानवे माझ्या सोबत होते. मात्र खालच्या पातळीवर भाजपच्या कारक्य र्त्यांनी काम केलं नाही ,असेही ते म्हणाले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *