श्री साई जन्मस्थळाचा मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र वाद िशगेला

देश-विदेश

अहमदनगर : साथी ऑनलाईन

विवारी साईबाबा जन्मभूमी वादावरुन शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यातआला. सुट्टी असल्यामुळे भाविकांची साई दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली. मात्र, बाजारपेठ बंद असल्यामुळं साईभक्तांची मोठी गैरसोय झाली. शिर्डी शहरात ग्रामस्थ व साईभक्तांनी रॅली काढली. शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतला होता. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळी शिर्डीत द्वारकामाईसमोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीची सुरवात ‘शिर्डी माझे पंढरपूर’ आरती करून करण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

‘ओम साई नमो नम: ‘ चा जयजयकार करीत पालखी मार्गाने परीक्रमा शहरात काढण्यात आली. साईचरित्रातील ओव्यांचे फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. यावेळी सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त
तैनात करण्यात आला होता. साई चरित्रामधील जन्मस्थळाचा उल्लेख असलेली आवृत्ती गायब पाथरीकरांनी दावा केला आहे की, साई संस्थानने 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई
बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहमात्र हा उल्लेख पाथर्डी नावाने करण्यात आला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितले आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी
साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचादेखील दाखला दिला आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *