निबंधातून दु:ख मांडणाऱ्या मुलाला मंत्री मुंडे करणार मदत!

बीड राजकारण

मुंबई : साथी ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीतल्या शाळेत चौथीमध्ये शिकत असललेल्या मंगेश वाळके या लहान मुलाने
आपल्या वारलेल्या वडिलांवर हृदय हेलावून सोडणारा लिहिलेला निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या निबंधाची दखल सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबी च्या आजाराने वारले. मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली. आम्हाला कोणीही मदत करत नाही, मला व आईला रात्रीची चोरांची भीती वाटते. त्यामुळे पप्पा तुम्ही परत या असा निबंध मंगेशने लिहिला.

मंगेशची आई अपंग आहे. धनंजय मुंडे यांनी तात्काळ समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रूपये स्वयंरोजगारासाठी, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5 टक्के बसचा पास आणि दिव्यांग महामंडळामार्फत आणखी काही योजना लागू करून भरीव आर्थिक मदत करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मदत केल्यामुळे मंगेशच्या घरी समधानाचे वातावरण आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *