इंदिरा-करीम लाला भेटीचा मी साक्षीदार -सुंदर शेखर

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि माजीपंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याभेटीबद्दलचे विधान शिवसेनानेते संजय राऊत यांनी मागे घेतले असतानाच हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखरने राऊत यांच्या विधानाला पुष्टी देणारी माहिती एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. त्यामुळे राऊतांवर टीकेचे बाण सोडणारा महाआघाडीतील घटक पक्ष काँग्रेसची गोची होण्याची शक्यता आहे.

दिवंगत इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीचा मी साक्षीदार आहे, असे म्हणत राऊतांनी जे सांगितले ते खरेच असल्याचा दावाच सुंदर शेखरने केला आहे. इंदिरा गांधी या करीम लाला व हाजी
मस्तान यांना अनेकदा भेटल्या होत्या. मी स्वत: या भेटींचा सक्षीदार राहिलो आहे. इंदिरा गांधी मुंबईत येणार असतील तर करीम लाला यांना त्याबाबत दोन दिवस आधीच माहिती मिळायची, असा दावा शेखरने
केला आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *