(बीसीसीआय) च्या वार्षिक करारातून महेंद्रसिंग धोनी गायब: धोनी निवृत्ती घेणार का ?

खेळ जगत देश-विदेश

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या ( बीसीसीआय) ने गुरुवारी ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वार्षिक करारातील खेळाडूंची नावं जाहीर केली. या यादीतून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. धोनी बऱ्याच दिवसापासून आतंरराष्ट्रीय क्रीकेट पासून दूर आहे. त्यामुळे आता खरंच धोनी पर्वाचा अंत झाला आहे का हा प्रश्न आहे? बीसीसीआयनं 27 खेळाडूंना सेंट्रल करारात समाविष्ट करून घेतले आहे.

काही दिवसापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्री यांनी धोनी वनडे संघातून निवृत्ती घेईल असे म्हटले होते. आता बीसीआयच्या वार्षिक करारातीतून धोनीला वगळल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी कडे बघितले जाते.

कोणाचा कोणत्या ग्रेड मध्ये समावेश
ए+ ग्रेड – 7 कोटी  ए ग्रेड – 5 कोटी  बी ग्रेड – 3 कोटी सी ग्रेड – 1 कोटी

ए + ग्रेड – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ए ग्रेड – रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेस्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत

बी ग्रेड – वृद्धीमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल

सी ग्रेड – केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *