गडकरींच्या त्या वक्तव्यावरुन खैरेंचा दानवेंवर अप्रत्यक्ष निशाणा

औरंगाबाद औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद साथी ऑनलाईन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले होते. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी मोठा अडथळा आहेत. कंत्राटदारांना कामाची टक्केवारी मागतात, अशा लोकप्रतिनिधीमुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा घसरला आहे. रस्ते वेळेत पूर्ण होत नाहीत, अशी नाराजी गडकरी यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. या प्रकरणात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतली आहे. खैरे म्हणाले की, गडकरींचे ते वाक्य भाजपच्या ‘त्या’ नेत्यांसाठी होते. ज्याने मराठवाड्यातील सर्व कंत्राट आपल्या नातेवाईकांच्या घशात घातली आहेत. त्या व्यक्तीने प्रसिद्ध राजूर गणपती संस्थानाची जमीन देखील हडप केली आहे. स्वतः गडकरी यांनी ते नाव आपल्याला सांगितले होते. जे सर्वांना माहीत असून स्वतः गडकरींनी ते नाव जाहीर करावे, असे आवाहन देखील चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. खैरे यांचा रोख केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.

खैरे म्हणाले की, माझ्याकडे एक काॅन्ट्रॅक्टर आला होता. कामामध्ये एक मोठा नेता त्रास देत आहे, अशी तक्रार त्याने केली. मी त्याला गडकरींकडे घेऊन गेलो. गडकरींनी मला त्या व्यक्तीचे नाव सांगितले. मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी देखील या विषयावर बोललो तर मुख्यमंत्री म्हणाले आता काय करणार? त्यांच्याच पक्षाचा ज्येष्ठ नेता अशी कामे करत होता. त्या नेत्याच्या जिल्ह्यातील कामे बघा. त्या कामांविरोधात अर्जुन खोतकर यांनी देखील त्या नेत्याविरोधात आवाज उठवला. त्या प्रसिद्ध व्यक्तिकडेच सगळी कामे गेली आणि त्या रस्त्याच्या कामांची दुर्दशा झाली आहे. तो नेता प्रचंड भ्रष्टाचारी आहे. अशा नेत्यांवर सीबीआयने छापे टाकावेत, असे ते म्हणाले.

नितीन गडकरींनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केला होता. गंभीर बाब अशी की औरंगाबादच्या बैठकीत गडकरींना कंत्राटदारांनी थेट काही लोकप्रतिनिधींची नावचे सांगितली. नितीन गडकरी यांच्या समोर उस्मानाबाद
जिल्ह्यातील 100 कोटींच्या एका रस्त्याचा विषय आला होता. कंत्राटदारांने लोकप्रतिनिधी दोन टक्क्याप्रमाणं दोन कोटी मागत असल्याचा बैठकीत आरोप केला होता. इतकेच नव्हे पैसे दिल्याशिवाय कामच सुरू करू देत नाही, असे गडकरींना सांगितले होत

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *