गुरुजींनी मारलेला रुळाने जीवनाचा योग्य ‘रुल’ शिकवला – डाॅ शिवरत्न शेटे दिंद्रुड च्या जिल्हा प्रशालेत ३० वर्षांनंतर विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन

बीड

 

संतोष स्वामी दिंद्रुड। 9923980099

दिंद्रुड च्या जिल्हा परिषद प्रशालेत १९८८-८९ इयत्ता दहावी शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा रविवारी हर्षोल्लासात संपन्न झाला. या सोहळ्यात गुरुजींनी शिकवलेल्या अनेक गोष्टींची उहापोह विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगतात व्यक्त करण्यात आली, गुरुजींनी मारलेल्या रुळामुळे जीवनात जगण्याचा योग्य ‘रूल’ मिळाल्याचे विधान आपल्या मनोगतात शिवचरित्र कार शिवरत्न शेटे यांनी व्यक्त करत शाळे भोवती असलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला, महाराष्ट्रभर सामाजिक कार्य करत असताना शाळेतील शिकवलेल्या शिक्षकांच्या योग्य ते मार्गदर्शन यामुळे आपणही मजल मारल्याची शिवरत्न शेटे यांनी यावेळी सांगितले वर्तमानातील व्यस्त व धकाधकीच्या जिवनात बालपणीच्या सवंगड्यांना भेटुन प्रत्येकाच्या सुख दुखाच्या चार गोष्टींत एकरुप होण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकात डाॅ शिवरत्न शेटे यांनी सांगितले.शिवचरित्र व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सुपरिचित असलेले शिवव्याख्यानकार डाॅ. शिवरत्न शेटे, उद्योजक माऊली ठोंबरे,अंकुश ठोंबरे,विजय लगड,रामदिप डाके, उषा महाजन, संजिवनी पारेकर,संगिता देवगांवकर यांनी तिस वर्षांपूर्वी चे वर्गमित्रांना शोधुन काढत हा कार्यक्रम संपन्न केला.तत्पुर्वी गावातुन शिक्षकांची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली, सरस्वती मातेच्या प्रतीमापुजन व दीपप्रज्वलन करत तिस वर्षांच्या काळात मयत शिक्षकवृंद व वर्गमित्रांना श्रध्दांजली अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.या कार्यक्रमास १९८८-८९ बॅचचे मुख्याध्यापक थळकरी गुरुजी, खडके गुरुजी, बालिका कुलकर्णी बाई, जोगदंड गुरुजी, शिरपुरे गुरुजीं, माध्यमिक विद्यालय दिंद्रुड चे वर्तमान मुख्याध्यापक भगवान देशमाने,देवदुत ओमप्रकाश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुत्रसंचालन बंडु खांडेकर, प्रस्ताविक डाॅ शिवरत्न शेटे तर आभार प्रा सत्यप्रेम लगड यांनी व्यक्त केले.
सर्व शिक्षकांनी मनोगतात उतारवयातील सर्वात मोठी देणगी या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला दिल्याच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही शिकवतांना दिलेल्या माराचा आज फायदा दिसतोय, आम्ही चिखलाच्या गोळ्यास योग्य आकार दिल्याचे आज पहायला मिळत असुन या पेक्षा मोठा आनंद कुठलाच नसेल असेही शिक्षकांकडुन व्यक्त होतांना पहायला मिळाले. भोजना नंतर दुसर्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांचा वर्ग भरवण्यात आला.मांडी घालून बसले असतांना बालपणीच्या असंख्य आठवणी जिवंत झाल्याने व त्याच गुरुजींच्या हाताने खडु फळ्यावर शिकवून घेण्याचे भाग्य लाभल्याने सर्वजन भारावून गेले होते. हा क्षण खिडकीतून माजी विद्यार्थ्यांच्या परिवारातील सदस्यांनी पाहत असतांना मोबाइल मध्ये फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही येत्या काही दिवसांत हि शाळा पाडणार असुन येथे शासकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे शेवटी वर्गातून बाहेर पडतांना हा अविस्मरणीय क्षण ह्रदयात ठेवुन पानवलेल्या डोळ्यांनी विद्यार्थी व सोबत शिक्षकवृंद ही बाहेर पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *